Fitter

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील फिटर हा अभ्यासक्रम फार लोकप्रिय आहे . मेकॅनिकल ,केमिकल क्षेत्रातील अशी कोणतीही कंपनी नाही जिथे फिटर नाहीत . फिटर शिवाय कोणत्याही कंपनीत काम होऊच शकत नाही . मोठमोठे उड्डाणपूल ,मेट्रो ,रेल्वेच्या बांधणीचे कामे सुरु असतात तेथे फिटरची आवश्यकता असतेच . फिटर म्हणजे जोडण्याचे काम करणारा कुशल कामगार . मशीनची बांधणी ,वेगवेगळ्या उपकरणांची जोडणी तसेच केमिकल कंपनीत पाइपलाइनची जोडणी करण्याकरिता फिटरची आवश्यकता लागते .

फिटर हा अभ्यासक्रम ALL ROUNDER अभ्यासक्रम आहे . या अभ्यासक्रमामध्ये फिटर ट्रेड व्यतिरिक्त वेल्डर ट्रेडची कौशल्य ,नळ कारागिरांनी कौशल्ये , टर्नर ट्रेडची कौशल्ये ,शीट मेटल कारागिरांची कौशल्ये शिकवली जातात . तसेच शॉप फ्लोअर वर सुरक्षिततेचे महत्व मोजमाप करण्याची साधने ,व्हाईस व त्याचे प्रकार ,फाईल व त्यांचे वर्गिकरण ,हॅक्सॉ , जॉब मार्किंग करण्याचे साधने ,व्हर्नियर कॅलिपर ,व्हर्नियर हाईट गेज ,मायक्रो मीटर यांची कार्य व तत्व आणि मोजमापाची कौशल्य शिकवली जातात . या व्यतिरिक्त शीट मेटल ट्रेंड ची माहिती व प्राथमिक कौशल्य शिकवली जातात . धातू ला ड्रिल करण्यासाठी वापरात येणारे ड्रिल व त्याचे प्रकार आणि ड्रिलिंग सोबत जी ऑपरेशन जसे रिमिन्ग , काउंटर बोर , स्पॉट फेसिंग या बाबत आणि वेगवेगळ्या ड्रिलिंग मशीन त्यांचे मुख्य भाग आणि उपयोगात येणारी कामाचे वापर यांचे हि ज्ञान दिले जाते.

रोजगाराच्या संधी

  • उत्पादन आणि उत्पादन उद्योग.
  • स्ट्रक्चरल फॅब्रिकेशन जसे की पूल, छप्पर संरचना, इमारत आणि बांधकाम.
  • ऑटोमोबाईल आणि संबंधित उद्योग रस्ते वाहतूक आणि रेल्वे यासारखे सेवा उद्योग. जहाज बांधणी आणि दुरुस्ती पायाभूत सुविधा आणि संरक्षण संस्था
  • सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग जसे की BHEL, BEML, NTPC, इत्यादी आणि खाजगी उद्योग भारत आणि परदेशात. स्वयंरोजगार.

पुढील शिक्षणाचे मार्ग

  • अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, प्रशिक्षणार्थी नामांकित उद्योग/संस्थांमध्ये शिकाऊ प्रशिक्षण घेऊ शकतात.
  • अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, प्रशिक्षणार्थी डिप्लोमा कोर्स (लॅटरल एंट्री) निवडू शकतात.
  • अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी CITS अभ्यासक्रमाची निवड करू शकतात.